Product Summery
Author: Daniel Goleman
paperback
₹ 259
₹ 299
आजच्या सतत लक्ष विचलित करणाऱ्या युगात यशस्वी होण्यासाठी एकाग्रता हीच खरी सुपरपॉवर आहे. फोकस या पुस्तकात डॅनियल गोलमन एकाग्रतेमागील विज्ञान सोप्या भाषेत समजावून सांगतात. आपण जर आपला फोकस योग्य पद्धतीने विकसित केला तर, आपली नेतृत्वकौशल्ये, कार्यक्षमता आणि कामाचं मिळणारं समाधान, एका नव्या उंचीवर घेऊन जाऊ शकतो. आजच्या बदलणाऱ्या आणि गुंतागुंतीच्या जगात टिकून राहण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठीही तीक्ष्ण एकाग्रता आवश्यक आहे. ती कशी विकसित करायची, याचं सविस्तर मार्गदर्शन या पुस्तकात केलं आहे.
या पुस्तकात स्मार्टफोन आणि डिजिटल साधनांच्या काळात एकाग्रता कशी टिकवून ठेवावी मन विचलित करणाऱ्या गोष्टींना सामोरं जाण्यासाठीचे प्रॅक्टिकल उपाय उच्च कार्यक्षमता आणि उत्कृष्ट कामगिरीची गुरुकिल्ली प्रभावी आणि सजग नेतृत्वासाठी आवश्यक मानसिक शक्ती कशी मिळवावी फोकसचे तीन प्रकार - अंतर्गत, इतरांकडे केंद्रित आणि बाह्य डॅनियल गोलमन हे न्यूयॉर्क टाइम्सचे माजी विज्ञान पत्रकार असून तेरा पुस्तकांचे लेखक आहेत. ते व्यावसायिक गट, उद्योगक्षेत्र आणि विद्यापीठ परिसरांमध्ये नियमितपणे व्याख्याने देतात. त्यांनी येल विद्यापीठाच्या चाइल्ड स्टडीज सेंटरमध्ये अकॅडमिक, सोशल अँड इमोशनल लर्निंगसाठी कार्य करणाऱ्या सहयोगी संस्थेची सह-स्थापना केली आहे (ही संस्था सध्या युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉय, शिकागो येथे कार्यरत आहे).