Product Summery
Author: Sheela Sunilkumar Deshmukh
paperback
₹ 144
₹ 160
श्री समर्थांनी दासबोधात “नवविधा भक्तीचे” सुंदर रीतीने आणि मर्मग्राही विवेचन केले आहे आणि ते सर्व भक्तांना शाश्वत मार्गदर्शन करणारे आहे हे मात्र- नि:संशय!!! श्री समर्थांनी चौथ्या दशकाच्या नऊ समासांमध्ये नऊ प्रकारच्या भक्तीचे अतिशय मार्मिक वर्णन केले आहे आणि दहाव्या समासात सलोकता, समिपता, स्वरूपता व सायुज्यता या चार मुक्तींचे विवरण केले आहे. मानवी जीवनाचे अंतिम ध्येय म्हणजे मुक्ती मिळवणे, मोक्ष मिळविणे होय. भक्तिमार्गाने जाऊन परमेश्वराचे सान्निध्य मिळवून आपल्या जीवनाचे सार्थक करणे हे प्रत्येक जीवाचे अंतिम लक्ष्य असते. भक्तिचेन योगें देव । निश्चयें पावती मानव । एेसा आहे अभिप्राव । ईयें ग्रंथी ।। - श्रीमत््दासबोध (१ - १ - ४) लेखिका या एम.ए.बी.एड् असून सेवानिवृत्त मुख्याध्यापिका आहेत. माहेर आणि सासर दोन्हींकडून समर्थ रामदास भक्ती परंपरेचा वारसा त्यांना लाभला. त्याने प्रेरित होऊन समर्थ रामदासांच्या वाङ्मयावर आधारित 'रामपाठ निरूपण पुष्पे' व 'राम तोचि विठ्ठल' ही पुस्तके लिहिली, जी समर्थ विद्यापीठ, सातारा यांनी त्यांच्या विविध परीक्षांच्या अभ्यासक्रमास पूरक म्हणून घोषित केली आहेत. दासबोधातील माणिक-मोती पुस्तक अभ्यासूंना चिंतनासाठी उपयुक्त ठरावे हाच लेखिकेचा उद्देश आहे.