Product Summery
Author: Patrick King
paperback
₹ 225
₹ 250
द आर्ट ऑफ सेल्फ अवेअरनेस ही एक अशी यात्रा आहे, जी तुम्हाला कोणत्याही परदेशी दौऱ्यावर घेऊन जाणार नाही तर हा आपल्या अंतरंगामध्ये जाण्याचा प्रवास आहे. हा प्रवास काही अंशी धोकादायक, भीतीदायक आणि असहज करणारा असला तरीही यात्रा पूर्ण केल्यानंतर मिळणारा पुरस्कार असामान्य आहे.
स्वजागरूकता म्हणजे फक्त तुमचं नाव जाणणं नाही तर स्वजागरूकता म्हणजे तुम्ही कशामुळे आनंदी होता, कशामुळे दुःखी होता हे जाणणं. याचबरोबर अशा कोणत्या मान्यता आणि खोलवर रुजलेल्या धारणा आहेत, ज्यामुळे या भावना उत्पन्न होतात हेही समजून घेणं. काही लोक त्यांच्या समस्यांचं समाधान बाहेरील जगामधे शोधत असतात. पण हे फक्त जखमेवर बँडेज लावण्यासारखं आहे. खरंतर आपल्याला आनंदी आणि दुःखी करणाऱ्या गोष्टीचं मूळ कारण हे आपल्या आतमधेच दडलेलं असतं. आता त्या गोष्टीचा शोध घेण्याची वेळ आली आहे. मेटाकॉग्निशन हे सर्वात कठीण कौशल्य आत्मसात करा : मेटाकॉग्निशन म्हणजे आपल्या विचारांवर विचार करणं.