Product Summery
Author: Nujood Ali
paperback
₹ 225
₹ 250
"मी एक साधी गावाकडची मुलगी आहे, जी नेहमीच आपल्या वडलांची आणि भावाची आज्ञा पाळत आली आहे. लहानपणापासूनच प्रत्येक गोष्टीला कायम 'हो' म्हणायलाच शिकवलं गेलं. पण आज मी 'नाही' म्हणायचा निर्णय घेतला आहे."
२००८ मध्ये जेव्हा नुजूद अलीच्या वडलांनी तिचं लग्न तिच्यापेक्षा तिप्पट वयाच्या पुरुषाशी लावून दिलं तेव्हा तिचं बालपण अचानक संपलं. नुजूदच्या पतीने तिच्यावर केलेल्या अत्याचारांबद्दल आणि तिच्या धाडसाने घरातून पळून जाण्याबद्दल ती अतिशय स्पष्ट शब्दांमध्ये मांडते. स्थानिक वकिलांच्या आणि प्रेसच्या मदतीने नुजूदने तिचं स्वातंत्र्य परत मिळवलं. ज्या देशात अर्ध्याहून अधिक मुलींचं लग्न कायदेशीर वयापेक्षा कमी वयात लावून दिलं जातं, अशा येमेनमध्ये ही एक असाधारण कामगिरी होती. नुजूदने येमेनी रितीरिवाजांना आणि तिच्या स्वतःच्या कुटुंबाला धाडसीपणे आव्हान दिल्यामुळे मध्यपूर्वेतील इतर तरुणींना त्यांच्या लग्नाला आव्हान देण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे.