Product Summery
Author: Jonas Salzgeber
paperback
₹ 290
₹ 325
महानता तुमच्या आतमध्येच आहे. आता वेळ आली आहे तिला जागृत करण्याची तुम्ही सर्वोत्तम जीवन जगत आहात का? तुम्ही तुमच्या उद्देश्याच्या दिशेने यात्रा करत आहात की त्यापासून दूर जात आहात? तुम्ही ज्या पद्धतीने जगत आहात ते तसंच चालू ठेवून तुम्हाला स्वत:विषयीची हीच कथा चालू ठेवायची आहे की तुम्हाला वेगळ्या भवितव्याची अपेक्षा आहे? लुईस होवेस या न्यूयॉर्क टाइम्सच्या बेस्टसेलर लेखकाने त्यांच्या अभ्यासांती हे पुस्तक लिहिलं आहे ज्यामध्ये आपल्या भूतकाळावर मात करून आपलं भविष्य अधिक शक्तिशाली आणि समृद्ध कसं करता येईल याविषयी मार्गदर्शन केलं आहे. वैयक्तिक अनुभव, शास्त्रशुद्ध धोरणे आणि जगप्रसिद्ध व यशस्वी लोकांच्या मार्गदर्शनामुळे तुम्ही सहजतेने पुढील गोष्टी करू शकाल : तुम्ही तुमचं अर्थपूर्ण मिशन ठरवून तुमच्या जीवनाच्या उद्देश्याच्या दिशेने वाटचाल करू शकाल. तुमच्यामधील आत्मशंकेमागील खरं कारण काय आहे हे शोधून तुम्हाला मागे खेचणार्या गोष्टींवर मात करू शकाल. स्वत:ला निराश करणार्या विचारांपासून मुक्त होऊन तुम्ही समृद्ध जीवन जगायला सुरुवात कराल. तुमच्यामधील महानतेला साध्य करून तुमच्या भोवतालच्या लोकांवर तुम्ही सकारात्मक परिणाम घडवू शकाल. या पुस्तकातील धडे आणि धोरणे अंमलात आणून तुम्ही महानतेच्या मानसिकतेच्या आधारे तुमच्या स्वप्नांना वास्तवात आणू शकाल. तुम्ही तयार आहात का? तुमची महानतेची यात्रा सुरू होत आहे!