Product Summery
Author: Dr.Abhijeet Patki
paperback
₹ 260
₹ 299
या पुस्तकामध्ये अशा ५० शोधांचा समावेश आहे जे शोध अपघाताने लागले आहेत. शास्त्रज्ञ दुसऱ्याच कुठल्यातरी वस्तूच्या किंवा रसायनाच्या शोधात असताना काहीतरी वेगळे घडले आणि हे शोध लागले. सुरुवातीला कदाचित प्रयोग फसल्यासारखे वाटले असले, तरीही नंतर याच शोधांनी मोठी क्रांती केली आणि जगाला मोठी दिशा दिली. कोणत्याही फसलेल्या प्रयोगामधून नवीन क्रांती घडण्यामागील मुख्य कारण होते त्या शास्त्रज्ञांची चिकाटी, सातत्य, चिकित्सक वृत्ती आणि समर्पण. या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे याची लेखनशैली अतिशय सहज सोपी आहे आणि अतिशय मनोरंजक पद्धतीने हे शोध मांडले आहेत. या पुस्तकामुळे आपल्या सर्वांमध्ये दडलेल्या शास्त्रज्ञाला नक्कीच एक नवीन दृष्टी मिळेल आणि कदाचित आपल्यापैकीच कोणीतरी रोज घडणाऱ्या गोष्टींमधून जगाला नवीन दिशा देणारा एखादा शोध लावू शकेल.
काही आविष्कार पेनिसिलीन कॉर्नफ्लेक्स आईसक्रीम कोन काडेपेटीच्या काड्या भूलशास्त्र मायक्रोवेव्ह ओव्हन कोका कोला सुरक्षा काच विद्युत चुंबक स्टेनलेस स्टील झेरॉक्स मशीन सुपर ग्लू