Product Summery
Author: David Allen
paperback
₹ 250
₹ 299
डेव्हिड अॅलनची शक्तिशाली उत्पादक तत्त्वे जाणून घ्या आणि ढोरमेहनत करण्याऐवजी हुशारीने काम करण्याची तुमची क्षमता वाढवा. फास्ट कंपनी ज्यांना "वैयक्तिक उत्पादकतेचे गुरू" म्हणते असे अॅलन विचारतात, अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला मागे खेचते ? आणि दाखवून देते की, आपलं मन, टेबल आणि हेतू स्वच्छ आणि स्पष्ट असेल तर आपण कुठल्याही गोष्टीसाठी तयार (रेडो फॉर एनिथिंग) असू शकतो.
हे पुस्तक तुम्हाला पुढील मार्ग विस्ताराने सुचवते सर्जनशीलतेसाठी तुमचं मन रिकामं (स्वच्छ) करा तुमचं ध्यान केंद्रित करा असा आराखडा तयार करा, जो काम करेल गोष्टी पूर्णत्वाकडे नेण्यासाठी पावलं उचला तुमच्या वेळेचे नाही तर तुमच्या मनाचे व्यवस्थापन करा, असं अॅलन म्हणतात. या पुस्तकात दिलेल्या छोट्या पण प्रेरणादायी धड्यांमधून आपण हे शिकतो की, दररोजच्या जीवनात वेगवेगळ्या निवडी करताना, निर्णय घेताना आणि वेगवेगळ्या परिस्थितीला तोंड देताना एखाद्या मार्शल आर्ट तज्ज्ञासारखं शांत आणि एकाग्र कसं राहावं, या पुस्तकातील प्रत्येक तत्त्व आपल्याला नवीन पद्धतीने विचार करायला भाग पाडतं. त्याचबरोबर कमी प्रयत्नात, फारसा ताण न घेता आणि जास्त ऊर्जेने काम कशी पूर्ण करायची हे दाखवतं.