Product Summery
Author: Achyut Godbole & Sayali Kulkarni
paperback
₹ 315
₹ 350
सीनियर कौन्सिलिंग सायकोलॉजिस्ट, मेंटल हेल्थ एज्युकेटर, वरिष्ठ समुपदेशन मानसशास्त्रज्ञ, मेंटल हेल्थ एज्युकेटर, संशोधक, लेखिका आणि प्रशिक्षक म्हणून सायली कुलकर्णी गेली अठरा वर्षांहून अधिक काळ मानसशास्त्र, शिक्षण आणि मानसिक स्वास्थ्य या क्षेत्रात कार्यरत आहेत. सायली कुलकर्णी
मानवी मनापेक्षा मोठं रहस्य अजूनही जगात नाही ! या पुस्तकात मानसशास्त्रीय समुपदेशनाच्या प्रत्यक्ष अनुभवातून समोर आलेल्या ५० विलक्षण, अस्वस्थ करणाऱ्या, कधी धक्कादायक तर कधी अंतर्मुख करणाऱ्या कथा आहेत. या कथा ओव्हरथिंकिंग, पोस्टपार्टम डिप्रेशन, कन्फर्मेशन बायस, एकटेपणा, गॅसलाइटिंगची शिकार होणे, व्हिक्टिम मेंटॅलिटी, इन्सोम्निया, बिट्रेयल ट्रॉमा, सायबरकॉन्ड्रिया, सुपर वुमन सिंड्रोम इत्यादी समस्यांवर आधारित आहेत. पण या कथा केवळ समस्या आणि त्यांच्यावरचे उपाय सांगत नाहीत, तर प्रत्येक व्यक्तीच्या वागण्यामागचं मन समजून घेण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक कथेनंतर त्यामागचं मानसशास्त्रही उलगडून सांगितलं आहे. त्यामुळे हे पुस्तक वाचताना आपण केवळ दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावत नाही, तर नकळत स्वतःकडेही नव्या नजरेनं पाहायला लागतो. या पुस्तकात... करिअरचा ताण नात्यांमधलं नियंत्रण राग आणि नैराश्य पालकत्वाचे प्रश्न डिजिटल जगाचं आव्हान बालपणाच्या जखमा व्यसन आणि एकटेपणा मनातून बाहेर पडण्याचे मार्ग 'मनवा' म्हणजे केवळ ५० मानसशास्त्रीय केसेसचा संग्रह नाही. हा माणसाला समजून घेण्याचा, त्याच्या मनामागची गोष्ट ऐकण्याचा आणि कदाचित स्वतःलाही नव्यानं ओळखण्याचा प्रवास आहे.