Author: Sarika Kandalgoankar

फेरा कालचक्राचा | Fera Kalchakracha | Sarika Kandalgoankar | Marathi Book | मराठी कादंबरी

  • Pages : 368
  • Category : Fiction
  • ISBN : 9788169565202
  • Publisher : MyMirror Publishing House Pvt.Ltd.
  • Availability : In Stock
  • Edition :
  • Dimensions : 21 cm * 2 cm* 14 cm

Product Summery

paperback

₹ 315 ₹ 350


Qty:

Tab Article

"ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि। तन्नो रुद्रः प्रचोदयात्॥" समोर मंदिरात महादेवाला अभिषेक सुरू होता. ती मात्र आपल्या महालात खिन्नपणे बसली होती. "राजकुमारी..." दासी धावत धावत तिच्या महालात आली. तिला तिचं उत्तरीय सांभाळायलाही वेळ मिळाला नव्हता. ती धापा टाकत उभी राहिली. धावत आलेल्या तिला बघून राजकुमारीला काहीतरी अनिष्ट येते आहे, याची जाणीव झाली. ती दासीशी काही बोलणार तोच तिच्या महालात तो आला. तिचा चेहरा बघून तो खदाखदा हसायला लागला. "आता तरी सांगणार ना.. कुठे ठेवला आहे तो खजिना?" "इल्लयी... ओरूपोदूम इल्लयी... नाही... कधीच नाही... तो खजिना या राज्याचा आहे. तुझ्यासारख्या द्रोह्याला कधीच मिळणार नाही." ती रागाने फुत्कारत होती. "द्रोही! कोण द्रोही? नान ओरू राजा. मी आता इथला राजा आहे. तर... राजाज्ञा आहे. खजिना कुठे लपवला आहेस ते सांग." त्याने तिच्या मानेवर तलवार ठेवली. "आता तर तो तुला कधीच मिळणार नाही." ती त्याच्या नजरेला नजर देत म्हणाली. "बऱ्या बोलाने विचारतो आहोत. सांगून टाक. नाहीतर तुझे असे हाल होतील की मरण बरं असं वाटेल." त्याच्या चेहऱ्यावर क्रूर हसू होतं. ती तरीही बोलायला तयार नाही, हे बघून त्याने सैनिकांना बोलावण्यासाठी तलवार खाली घेतली. तेवढ्या अवधीत तिने हातातली अंगठी तोंडात घातली. "ज्या राज्यासाठी तू हे केलंस, ते राज्य तुला लाभणार नाही. तो खजिना तुला कधीच मिळणार नाही... शाप आहे हा आमचा..." ती तडफडत खाली पडली. "वाचवा... कोणी तरी वाचवा..."

0 REVIEW FOR फेरा कालचक्राचा | Fera Kalchakracha | Sarika Kandalgoankar | Marathi Book | मराठी कादंबरी

ADD A REVIEW

Your Rating

RELATED BOOKS